के. रा. जोशी - लेख सूची

घोंगे यांच्या संशोधनातील भकासपणा

१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे …

बाराखडीतील अं’ चे स्वरूप

आजचा सुधारकच्या जुलै ९८ च्या अंकात ‘अ’ च्या स्थानाविषयी काही उद्बोधक चर्चा ‘स्फुटलेख’ या शीर्षकाने केलेली आढळली. हा ‘शिक्षाशास्त्र (उच्चारणशास्त्र) व व्याकरणशास्त्र’ यांच्या अंतर्गत येणारा विषय, त्या दृष्टीने पुढील माहिती उपयोगी होण्याचा संभव वाटतो. अ आ च्या बाराखडीत “अं अः’ का येतात, तर ते अनुस्वार-विसर्गाची ओळख व्हावी म्हणून. ‘अं’ व ‘अ’ हे स्वरापुढे क्रमाने येणारे …

आजचा सुधारकची सात वर्षे

आजचा सुधारकचा मार्च १९९७ चा अंक हा या मासिकाच्या आयुष्याची सात वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. बुद्धिवादाने उद्बोधन या दृष्टीने चालविलेल्या मराठी मासिकाला सात वर्षे पूर्ण करता आली हीही एक उपलब्धी आहे. स्वच्छ व शुद्ध मुद्रण करण्याचा प्रयत्न, विज्ञापनांचा अस्वीकार, प्रायः नियमित प्रकाशन, पृष्ठसंख्या अल्प असली तरी विशिष्ट विचारांचा प्रचार व्हावा म्हणून दिला जाणारा भर …

हिंदू व हिंदुत्व

आजचा सुधारकच्या ऑक्टोबर व डिसेंबर ९५ च्या अंकात प्रा. ह. चं. घोंगे यांनी ‘हिदुत्व अन्वेषण’ या शीर्षकाने हिंदू व हिंदुत्व या विषयी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांतील काही बाबी प्रातिनिधिक समजून त्यांचा परामर्श घेतला जात आहे. संस्कृत कोषातील हिंदू व हिंदुधर्म याविषयी उपलब्ध माहिती आपट्यांचा प्रसिद्ध संस्कृत-इंग्रजी शब्दकोष जरी वाचण्याचे थोडे कष्ट …

विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप

एकीकडे स्वतःच्या आस्तिकतेचे आणि दुसरीकडे स्वतःच्या नास्तिकतेचे क्रमशः मंडन करणारे प्रा. मे. पु. रेगे आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे दोन विशेष लेख आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. ईश्वर हा जगाचे कारण आहे, हा युक्तिवाद पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात कसा मांडला जातो आणि कसा खंडित केला जातो, याचा हा भारतीय अनुवाद दिसतो. त्यात …

तुमचे सर्व लिखाण भाबडेपणाचे, तर्कदुष्ट

श्री दिवाकर मोहनी यांस सप्रेम नमस्कार गेले सहा महिने आजचा सुधारकच्या वेगवेगळ्या अंकांतून आपले स्त्रीमुक्तिविषयक विचार मोठ्या हिरीरीने तुम्ही मांडत आहात. त्यामुळे समाजकल्याण होणारच असा तुमचा विश्वास तुमच्या लिखाणात दिसतो. स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीचा ‘अनिवार्य पैलू तुमच्या मते आहे. स्त्रियांची मागणी असो किंवा नसो, हे दिले नाही तर समाज कर्तव्याला चुकला असे तुम्ही सतत …

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ! आक्षेपकांचा परामर्श

आजच्या सुधारकच्या मे व जून १९९४ च्या अंकात ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ या शीर्षकाने ‘धारणाद्धर्म इत्याहुः’, ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति आणि ‘रक्षण की राखण’ या विषयांचा ऊहापोह करण्यात आला होता. या तीनही विषयांची चर्चा आजच्या सुधारकमधून यापूर्वी श्रीमान् संपादकांसहित इतरांनी वरचेवर सदैव एकपक्षीय केलेली होती. ती अधिक समग्र व्हावी म्हणून या विषयाची संदर्भसहित दुसरी …

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ (भाग ३)

मनू हा स्त्रीद्वेष्टा आहे, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली आहेत. पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी ‘स्त्री’ला बंधनात जखडून ठेवले पाहिजे, असे मनूचे मत आहे, अशी मनुस्मृतीच्या अनेक पुरोगामी अभ्यासकांची समजूत असून याविषयी वेळोवेळी ते सतत लिहून मनूविषयी आपला निंदाव्यंजक अभिप्राय वाचकांच्या गळी उतरविण्याची अविश्रांत खटपट चालू ठेवतात. मनूविषयीचे आपले हे मत मनुस्मृतीच्या सखोल अभ्यासावर आधारलेले …

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ – (भाग १, भाग २)

– १ – ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे प्रसिद्ध वचन अनेकवार वापरले जाते. त्याचा संदर्भ पाहिल्यावर ‘धर्म’ शब्द वापरणार्‍यांच्या मनात काय अर्थ होता; तसेच धर्म वापरणारे भारतीय तो मुख्य कोणत्या अर्थाने वापरतात हे स्पष्ट व्हायला काही आडकाठी नाही. पण हे काहीही न करता या ना त्या रूपाने धर्मकल्पनेवर उठविली जाणारी झोड न्याय्य दिसत नाही. प्रस्तुत वचन हे …

चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन

प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची …

चर्चा- विवेकवादातील भोंगळ नीतिविचार

‘विवेकवाद’ या शीर्षकाच्या अंतर्गत प्रा. दि. य. देशपांडे यांनी नीतिविचाराची स्वमते चिकित्सक मांडणी ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या अनेक अंकातून लेखमाला लिहून चालविली आहे. त्याविषयी त्यांना विचारण्यात आलेल्या शंकांची उत्तरे त्यांनी विवेकवाद – २० (एप्रिल ९२) मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींचे नीतिविषयक विचार यामुळे एकत्रित वाचावयाला मिळतात हा या लेखमालेचा अभिनंदनीय …